Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»चोरांच्या टोळीत पोलिस उपनिरीक्षकाचाही सहभाग !
    क्राईम

    चोरांच्या टोळीत पोलिस उपनिरीक्षकाचाही सहभाग !

    Vikas PatilBy Vikas PatilApril 17, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोरांच्या टोळीत पोलिस उपनिरीक्षकाचाही सहभाग !

    चोपडा ( प्रतिनिधी ) –

    चक्क चोरी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकच चोरट्यांच्या टोळीसोबत आल्याचे दिसून आले आहे. चोपडा शहरातील बसस्थानक परिसरात चोरी करण्यासाठी टोळीसोबत आलेल्या जालन्याच्या पीएसआयचा स्थानिक गुन्हे शाखेसह चोपडा पोलिसांनी पर्दाफाश केला.

    पळून जात असतांना या पथकाने प्रल्हाद मालटे (वय ५८, रा. सदर बाजार, जालना) या पीएसआयसह चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यात सहभागी असलेला पीएसआय तीन महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते, मात्र त्यापुर्वीच त्यांच्या कारनाम्यांचा भांडाफोड झाला आहे. चोपडा शहरातील बस स्थानक परिसरात बाहेर जिल्ह्यातील टोळीकडून गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे दागिने आणि पैसे लांबविल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह एलसीबीचे पथक संशयितांच्या मागावर होते.

    तीन दिवसांपासून पथक बसस्थानक परिसरात सापळा रचून बसलेले होते. चोरीच्या उद्देशाने आलेली टोळी पळून जात असतांना ही टोळी (एमएच ४३, २९२८) क्रमांकाच्या चारचाकीतून पसार झाल्याची माहिती पथकाला मिळाली.पथकाने धरणगाव नाक्यावर सापळा रचत पळून जाणाऱ्या टोळीला अडविले. या वाहनात टोळीसोबत असलेले जालना येथील पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मालटेदेखील मिळून आले.

    बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या टोळीतील श्रीकांत बघे (वय २७ रा. गोपाल नगर, खामगाव), अंबादास साळगावकर (वय ४३ रा. माना, ता. मूर्तिजापुर जि. अकोला), रउफ शेख (वय ४८, रा. महाळस, जि. बीड) यांच्या मुसक्या आवळल्या. अंबादास साळगावकर याच्यावर तब्बल २७ चोरीचे गुन्हे दाखल आहे. त्यामुळे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई चोपडा पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, जितेंद्र वल्टे, पोहेकॉ विलेश सोनवणे, दिपक माळी, रवींद्र पाटील, पोना हेमंत पाटील यांच्या पथकाने केली.

    जालना पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले प्रल्हाद मानटे यांना चोरट्यांच्या टोळीसोबत चोरी करण्यासाठी येतांना पथकाने ताब्यात घेतले. हे उपनिरीक्षक सदर बाजार बस स्थानकावर ड्युटीवर असतांना त्यांची या संशयितांसोबत ओळख झाली. तेथूनच हे त्यांच्या संपर्कात असल्याचे देखील पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.