परमपूज्य व्यास स्वरूप शास्त्री श्री भक्तीस्वरूपदासजी यांचे प्रतिपादन
साईमत/फैजपूर, ता.यावल/प्रतिनिधी
कृष्णाने कालिया नाग मर्दन केले. त्याआधी स्वतः कद्दू क्रीडा (चेंडू) खेळत होते. शारीरिक क्रीडा खेळण्यामुळे शरीराचा चांगला विकास होत असतो. त्या माध्यमातून मनाचा व बुद्धीचा पण विकास होत असतो. मुलांमध्ये संघटन शक्ती वाढत असते आणि म्हणून प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना जेवढे बनेल तेवढं जमिनीशी जोडून ठेवण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी मैदानी खेळ खेळण्याचे प्रयत्न करायला पाहिजे, असे प्रतिपादन शास्त्री श्री भक्ती स्वरूपदासजी यांनी श्री स्वामिनारायण मंदिर कोरपावलीद्वारा आयोजित श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ पारायण कथेच्या सहाव्या दिवशी कथेच्या माध्यमातून केले.
आज कालची पिढी मैदानी खेळ न खेळता मोबाईलच्या आहारी गेलेली आहे. त्यामुळे मनोरुग्ण होत आहे. त्यांच्या बुद्धीचा परिपूर्ण विकास होत नाही आणि त्याद्वारे शारीरिक मानसिक बौद्धिक हताशा त्यांच्या हाती येत आहेत. चांगल्या कामांसाठी मोबाईल व टेक्नॉलॉजीचा वापर करावा परंतु मोबाईल हेच माझे जीवन आहेत, अशा प्रकारे जीवन जगणारे मुले, येणारी पिढी हे रोगिष्ट होणार आहेत आणि म्हणून आपल्या मुलांची आपल्या नातोडांची काळजी आपण स्वतः घ्यायला पाहिजे.
प्रथम सत्रात भगवंताने खेळलेला ऱ्हास त्याची वेशभूषा सुंदर सजवण्यात आलेली होती. त्यानंतर सायंकाळी आजच्या दिवशी रुक्मिणी विवाह याची वेशभूषा सजवून सुंदर भगवंताचा विवाह सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुला मुलींच्या विरुद्ध कधीही आई-वडिलांनी लग्न करू नये आधीपासूनच त्यांना चांगले संस्कार देऊन ते योग्य वर शोधतील किंवा आई-वडील सांगतील तिथे प्रेमाने लग्न करतील. अशाप्रकारे त्यांना विश्वासामध्ये घ्यायला पाहिजे. जेणे करून समाजामध्ये होत असलेले घटस्फोटाचे केस हे कमी होतील व आपली मुले-मुली सुखी होतील. विशेष मुहूर्तावरती लग्न करणे आपल्या ऐपतप्रमाणेच खर्च करणे प्रॉपर्टीला महत्त्व न देता संस्कारी कुटुंब त्याला महत्त्व देणे जेणेकरून आपली मुलगी व आपला मुलगा हा शेवटपर्यंत सुखात संसार करू शकेल, असा संदेश शास्त्री श्री भक्ती स्वरूप दास जी यांनी कथेच्या माध्यमातून दिला याप्रसंगी खूप काही संतांची उपस्थिती लाभली. प्रति दिवसाप्रमाणे आजही बाहेर जाऊन मोठ्या संख्येने हरिभक्त आले होते. त्यांनी सुद्धा कथा श्रवणाचा लाभ घेतला.