बांगलादेशातील त्रस्त हिंदूंचे रक्षण करा

0
10

फैजपूरला नायब तहसीलदारांना हिंदु जनजागृती समिती, इस्कॉन, हिंदुत्ववादी संघटनेतर्फे निवेदन

साईमत/फैजपूर/प्रतिनिधी 

बांगलादेशात गेल्या काही महिन्यांपासून अल्पसंख्य असलेल्या हिंदूंवर पाशवी अत्याचार केले जात आहेत. तेथील शासन अन् प्रशासन देखील त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना सहाय्य करत आहे. आता तर तेथील हिंदू नेते, साधू संत यांनाही खोट्या आरोपात अडकवण्याचे षडयंत्र बांगलादेशात केले जात आहे. याविरुद्ध बांगलादेशला खडे बोल ऐकवून तेथील हिंदूंचे रक्षण भारत सरकारने करावे, अशा मागणीचे निवेदन फैजपूर येथील नायब तहसीलदार जगदीश गुरव यांना इस्कॉन, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादीतर्फे देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेश सरकारवर दबाव आणून इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांची विनाअट सुटका करण्यासाठी भारत सरकारने पाऊल उचलावे आणि त्यांना आवश्यक ती सुरक्षा देण्यात यावी. हिंदू अल्पसंख्याकांचे संरक्षण: बांगलादेशातील हिंदू समाजाच्या धार्मिक स्थळांचे आणि सांस्कृतिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय मंचावर बांगलादेश सरकारला जबाबदारीची जाणीव करून द्यावी. आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप बांगलादेशातील हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी आणि मानवी हक्कांसाठी संयुक्त राष्ट्रांसह अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घेऊन योग्य पावले उचलावी. भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव आणून अल्पसंख्याक संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी करावी, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

यावेळी इस्कॉनचे कन्हैया दास, प्रवीण महाराज, चंद्रशेखर परदेशी, नरेंद्र परदेशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. चंद्रशेखर पाटील, ॲड.कालिदास ठाकूर, भाजपाचे सचिन बऱ्हाटे, अभय वारके, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गणेश देवकर, दीपक हिंदू जनजागृती समितीचे सपन परदेशी, धीरज भोळे, अमोल निंबाळे, पप्पू जाधव, निलेश चौधरी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here