लोहाऱ्यातील मोफत आरोग्य शिबिराला प्रतिसाद

0
44

शिबिरात १५७ रुग्णांची तपासणी, विविध आजारांवर मार्गदर्शन

साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक ना.गिरीष महाजन यांची सलग सातवेळा आमदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल लोहारा विविध कार्यकारी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, भारतीय जनता पार्टी, ग्रामस्थ मंडळी, गोदावरी फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात १५७ रुग्णांनी नाव नोंदणी करून मोफत तपासणी केली. त्यामधील १०८ रुग्ण हे पुढील उपचारासाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय, जळगाव येथे येत्या ४ डिसेंबरला पाठविण्यात येणार असल्याची माहिती आयोजक शरद अण्णा सोनार (भाजपा लोहारा-कुऱ्हाड गटप्रमुख) यांनी दिली. शिबिरात हृदयरोग ॲन्जिओग्राफी ॲन्जोप्लास्टी तपासणीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले. रुग्णांना मोफत औषधी देण्यात आल्या.

शिबिराला विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रभाकर चौधरी, सरपंच अक्षय जैस्वाल, उपसरपंच दीपक खरे, शरद अण्णा सोनार, सुनील क्षीरसागर, ग्रामसेवक गजानन काळे, ग्रामपंचायत सदस्य अमृत चौधरी, अर्जुन पाटील, सुरेश चौधरी, ईश्वर देशमुख, संजय चौधरी, भास्कर आंबेकर, विजय चौधरी, माजी सरपंच रमेश चौधरी, रमेश लिंगायत, किसन पाटील, डॉ.विकास पालीवाल, अण्णा चौधरी, उमेश देशमुख, अनिल तडवी, भास्कर भोई, शरद कोळी, हितेश पालीवाल, गोपाल पाटील, अमोल पाटील, विशाल खाटीक पत्रकार चंद्रकांत पाटील, रमेश शेळके, गजानन क्षीरसागर उपस्थित होते.यशस्वीतेसाठी गोदावरी फाउंडेशन, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, धर्मदाय रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here