Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»देवगाव देवळी हायस्कुलमध्ये विद्यार्थी बनले ‘मास्तर’
    अमळनेर

    देवगाव देवळी हायस्कुलमध्ये विद्यार्थी बनले ‘मास्तर’

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 29, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महात्मा फुले स्मृतीदिन शिक्षक दिवस साजरा

    साईमत/अमळनेर/प्रतिनिधी

    क्रांतीसूर्य जोतीराव फुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिक्षक दिन साजरा करून महात्मा फुले हायस्कूलने नवा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या २२ वर्षांपासून संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २८ नोव्हेंबर हा दिवस महात्मा फुले स्मृतीदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. इयत्ता दहावीतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मुख्याध्यापकापासून ते शिपायापर्यंत भूमिका साकारत दिवसभर शाळेत अध्यापनाचे कार्य केले. सुरुवातीला क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त देवगाव देवळी हायस्कुलमध्ये विद्यार्थी ‘मास्तर’ बनले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय.आर. महाजन, एस.के.महाजन, अरविंद सोनटक्के, विद्यार्थी मुख्याध्यापक रागिणी पाटील यांच्यासह विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.

    इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी रागिणी पाटील हिने मुख्याध्यापकाची भूमिका साकारली. शिक्षक म्हणून सोनाली महाजन, उन्नती गायकवाड, मयुरी महाजन, हर्षल पाटील, पवन पाटील, रूपाली पाटील, प्रियंका पाटील, किर्ती मोरे यांनी शिक्षकाची भूमिका करत अध्यापनाचे कार्य केले. शिक्षकेतर कर्मचारी म्हणून राज जाधव यांनी भूमिका साकारली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. नंतर कार्यक्रमात विद्यार्थी मुख्याध्यापक रागिणी पाटी, विद्यार्थी शिक्षक मयुरी महाजन, सोनाली महाजन, शिक्षकांनी दिवसभर आलेले अनुभव कथन केले.

    महात्मा फुले यांचे गुण आत्मसात करा

    दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिवसभर उत्कृष्ट अध्यापनाचे काम केले. महात्मा फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचे गुण आत्मसात करा, असे अनिल महाजन यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. शेवटी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी, मुख्याध्यापिका रागिनी पाटील यांच्यासह सर्व शिक्षकांचा मुख्याध्यापक, शिक्षकांनी सत्कार केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner:चार जणांकडून साईड न दिल्याच्या वादातून व्यापाऱ्याच्या कारची तोडफोड

    February 20, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026

    Amalner : पिळोदे गावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.