विद्यार्थ्यांची रॅली काढून संविधान दिन उत्साहात साजरा
साईमत/यावल/प्रतिनिधी
तालुक्यातील मोहराळा येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत मंगळवारी, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी माध्यमिक मुख्याध्यापक सागर पवार होते. यावेळी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी भारताची संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
यावेळी राहुल जावळे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाबाबत माहिती दिली. त्यात संविधानाची मूल्ये व तत्त्वे यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रती वाचनासाठी उपलब्ध करून दिल्या. संविधान दिनानिमित्त मोहराळा गावातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन भूषण तायडे यांनी केले.