जनमानसात जावून संविधानाविषयी जनजागृती करण्याचे आवाहन

0
19

फैजपुरला धनाजी नाना महाविद्यालया संविधान दिन साजरा

साईमत/फैजपूर/प्रतिनिधी

संविधान उद्देशिकेची शपथ देवून जनमानसात जावून संविधान जनजागृती करावी, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आर.बी. वाघुळदे यांनी उपस्थित मान्यवरांसह एनएसएसच्या स्वयंसेवकांना केले. येथील धनाजी नाना महाविद्यालयात मंगळवारी, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी युवा नेते धनंजय चौधरी, माजी प्राचार्य प्रा. डॉ. जी.पी.पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. जाधव, उपप्राचार्य प्रा. डॉ.कल्पना पाटील, प्रा.डॉ.डी.एल.सूर्यवंशी, एनएसएस सहायक कार्यक्रमाधिकारी प्रा. विकास वाघुळदे, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि एनएसएसचे स्वयंसेवक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील एनएसएसचे स्वयंसेवक खिलचंद धांडे, आयुष वाघुळदे, चिन्मय सोनवणे, वैशाली शिंदे, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here