गोपूजन करुन पशुगणनेचे उद्घाटन, मान्यवरांची लाभली उपस्थिती
साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील सामरोद येथून एकविसाव्या पशुगणनेला नुकताच प्रारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुक्याचे सहाय्यक आयुक्त डॉ.संजय खाचणे होते. यावेळी पं.स.चे माजी सभापती नवलसिंग पाटील यांच्याहस्ते गोपूजन करुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच अनिल महाजन, प्रगतीशील शेतकरी विकास महाजन, ग्रामपंचायत सदस्य उषा परदेशी,.रूपाली कोळी, रंगनाथ पाटील, गौतम वाघ, संतोष कोळी, प्रवीण पाटील, पोलीस पाटील अनिल कांबळे आदी उपस्थित होते.
जामनेर पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वप्नजा लोखंडे यांनी पशुगणनेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच नवलसिंग पाटील, नाचणखेडाचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनीही मनोगत व्यक्त करुन पशुगणनेविषयी मार्गदर्शन केले. पशुपालन हा कृषी कुटुंबांसाठी महत्वाचे साधन आहे. भूमीहिन कुटुंबासाठी उत्पन्नाचे स्त्रोत आहे. दूध, अंडे, मास आणि लोकर यांच्या उत्पन्नाद्वारे अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण योगदान मिळत असल्याचे अध्यक्षीय भाषणात जामनेरचे सहाय्यक आयुक्त डॉ. संजय खाचणे यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
यावेळी डॉ. श्रीकांत व्यवहारे, डॉ. कुरील, बोदवडचे पशुधन विकास अधिकारी डॉ. दीपक साखरे, डॉ. एकनाथ खोडके, डॉ.रवी बिझोटे, डॉ. निलेश बाविस्कर, डॉ.गजानन भिंगाडे, डॉ.संजय चव्हाण, डॉ.इंगळे, डॉ. अमोल वराडे, डॉ. भागवत पाटील वाडी, डॉ.प्रफुल्ल डांगे यांच्यासह तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचारी, प्रगणक, पर्यवेक्षक उपस्थित होते.यशस्वीतेसाठी डॉ.अमित सोमकुवर, सरपंच अनिल महाजन यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. संदीप पाटील तर आभार नेरीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.श्रीकांत व्यवहारे यांनी मानले.