माणुसकी रुग्णसेवा समूह, छ.शाहू महाराज संस्थेतर्फे स्तुत्य उपक्रम
साईमत/लोहारा, ता.पाचोरा /प्रतिनिधी
येथे माणुसकी रुग्णसेवा समूह, छत्रपती शाहू महाराज संस्थेतर्फे गरजुंसाठी घेण्यात आलेल्या फॅमिली हेल्थ कार्ड सभासद नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराचा २५० सभासदांनी लाभ घेतला. फॅमिली हेल्थ कार्डमुळे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांमध्ये लागणाऱ्या बिलात २० ते ५० टक्क्यांपर्यंत सभासदांना सूट मिळणार आहे. त्यात ओपीडी, सोनोग्राफी, रक्त तपासणी, अतीदक्षता उपचार यांचा समावेश असणार आहे.
यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तथा ज्येष्ठ नागरिक प्रभाकर चौधरी, समाजसेवक गजानन क्षीरसागर, आ.आ.पटेल, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉ.सागर गरुड, छत्रपती शाहू महाराज संस्थेचे प्रकल्प अधिकारी आकाश एस.आर.के, ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ.केयूर चौधरी, कडू चौधरी, गोपाल पाटील, अमोल पाटील, सचिन पाटील, गजानन शिवदे, अशोक पालीवाल, राजू गीते, गुणवंत सरोदे, अक्षय देशमुख, सीताराम वाणी, सुपेश वाणी, राहुल शिवदे यांच्यासह माणुसकी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.