Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»यावलला मतदान जनजागृतीसाठी ‘मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’ पथनाट्य सादर
    यावल

    यावलला मतदान जनजागृतीसाठी ‘मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’ पथनाट्य सादर

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 30, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    उपशिक्षक डॉ.नरेंद्र महाले लिखित पथनाट्यातून केले समाज प्रबोधन

    साईमत/यावल/प्रतिनिधी

    जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अकलाडे तसेच जिल्हा सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील व माध्यमिकच्या कल्पना चव्हाण यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण जिल्ह्यात मतदान जनजागृतीपर कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार यावल आणि रावेर विधानसभा मतदारसंघांत यावल तालुक्यातील यावल शहरात यावल पंचायत समिती, यावल महसूल विभाग व शिक्षण विभागाच्यावतीने मतदान जनजागृती करण्यासाठी “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” पथनाट्याचे अत्यंत अभ्यासपूर्ण व मनोरंजक पद्धतीने प्रबोधनात्मक सादरीकरण केले.

    याप्रसंगी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावल पंचायत समितीच्या बीडीओ डॉ.मंजुश्री गायकवाड, गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, केंद्रप्रमुख शाकीर, कविता गोहिल, मुख्याध्यापक जी.डी.कुलकर्णी, ए.एम.गर्गे, जी.एन.खान, यावल तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

    यावल बस स्थानकात सरस्वती विद्यामंदिर यावलचे उपशिक्षक डॉ.नरेंद्र महाले लिखित ‘मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’ पथनाट्याचे मतदान जनजागृतीपर सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये मतदारांना मतदार नोंदणीपासून ते मतदानाच्या प्रक्रियेच्या संदर्भात मार्गदर्शन करून मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त मतदान करून वाढवावी, यासाठी प्रबोधन करण्यात आले. पथनाट्यात सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी संचित कोळी महाराज, यश वारके, विनायक बारी, उपशिक्षक डॉ.नरेंद्र महाले यांनी विविध भूमिका साकारत पथनाट्याचे सादरीकरण केले. पथनाट्यासाठी यावल बस आगाराचे प्रमुख दिलीप महाजन यांचे सहकार्य लाभले.

    मतदान जनजागृतीसाठी नागरिकांना आवाहन

    मतदान जनजागृतीसाठी बीडीओ डॉ.मंजुश्री गायकवाड यांनीही नागरिकांना आवाहन केले. याप्रसंगी यावल तालुक्यातील सर्व प्रसार माध्यमांच्या पत्रकार बांधवांनी हजेरी लावून मतदान जनजागृती प्रबोधनात सहकार्य केले. यशस्वीतेसाठी सरस्वती विद्यामंदिर, यावल, डॉ.झाकीर हुसेन हायस्कूल यावल, इंदिरा गांधी गर्ल्स हायस्कूल यावल, बाल संस्कार विद्या मंदिर, यावल या शाळांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके तर आभार डॉ.नरेंद्र महाले यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : “लाचखोरीला लगाम जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक

    March 31, 2026

    Savda : सावदा सहकारी दुध संस्थेत विदेशी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

    March 26, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.