रोटाव्हेटरमध्ये पाय अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

0
28

चांदसर गावात पसरली शोककळा

साईमत/धरणगाव/विशेष प्रतिनिधी

ट्रॅक्टरला रोटाव्हेटर जोडत असतांना अचानक रोटाव्हेटर सुरू झाल्याने ५९ वर्षीय शेतकऱ्याचा पाय अडकल्याने ते गंभीर जखमी झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी नातेवाईकांनी एकाच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. रमेश सुखा कोळी (वय ५९, रा. चांदसर, ता.धरणगाव) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे रमेश कोळी हे आपल्या पत्नी, दोन मुले आणि सुना यांच्यासोबत वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता चांदसर गावातील कृषी विद्यालयाच्या परिसरात ट्रॅक्टरला रोटाव्हेटर हे जोडत असतांना रमेश कोळी अचानक त्यांचा पाय मशिनीत अडकल्याने कंबरेपासूनचा खालचा भाग गंभीर जखमी झाला.

ही घटना घडल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी तपासून मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी हिराबाई, दोन मुले नामदेव आणि वासुदेव, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here