Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आता ‘ई-पंचनामा ॲप’च्या माध्यमातून जलद गतीने भरपाई मिळणार : तहसीलदार मोहनमाला नाझिरकर
    यावल

    नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आता ‘ई-पंचनामा ॲप’च्या माध्यमातून जलद गतीने भरपाई मिळणार : तहसीलदार मोहनमाला नाझिरकर

    saimatBy saimatOctober 14, 2024Updated:October 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तालुक्यात प्रत्येक तलाठ्यांचे यूजर आयडी तयार

    साईमत/यावल/प्रतिनिधी

    नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आता ‘ई-पंचनामा ॲप’ माध्यमातून जलद गतीने पारदर्शक, वस्तुनिष्ठ भरपाई मिळणार असल्याची माहिती यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी दिली. MRSAC आणि महाराष्ट्र राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तीत शेतपिक, जमिन, जनावर, घर, गोठांचे झालेले नुकसानीचे जलद, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी खास शासनाने ई-पंचनामा अत्यंत उपयोगी ‘ॲप’ विकसित केले.

    यासंदर्भात नाशिक विभागात ५ सप्टेंबर २०२४ रोजी विभागीय कार्यालय, नाशिक याठिकाणी नाशिक विभागातील महसूल, ग्रामविकास, कृषी विभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर जळगाव येथे गेल्या २० सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्याअनुषंगाने यावल तहसील कार्यालयात सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, नैसर्गिक आपत्ती क्लर्क यांना प्रशिक्षण देण्यात आले.

    दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी जिल्ह्यात सर्वप्रथम ‘ई-पंचनामा’ पोर्टलवर तालुक्याचे युजर आयडी क्रिएट केला आहे. त्यात तालुक्यातील सर्व कार्यरत तलाठी यांचे युजर आयडी तयार करून घेतले आहे. यापुढे तालुक्यात नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीचे पंचनामे ‘ई-पंचनामा’ ॲपवरच होणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026

    Yaval Sakli : यावल साकळी फाटा कुत्र्यामुळे नियंत्रण सुटले, युवकाचा मृत्यू

    March 5, 2026

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.