पहुर शिवारात कपाशीचे नुकसान, पावसाचा बसतोय फटका
साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पहुर शिवारात कपाशीचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. ऐन वेचणीवर आलेला कापूस पावसामुळे ओला झाल्याने गुणवत्ता खालावत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
काही प्रमाणात मका पिकाचेही नुकसान झाले आहे. कापून ठेवलेला कडबा खराब झाल्याने गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.
