Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रस्त्यांच्या खड्ड्यासंदर्भात मनसेचे महापालिकेसमोर ‘झोपा काढा’ आंदोलन
    जळगाव

    रस्त्यांच्या खड्ड्यासंदर्भात मनसेचे महापालिकेसमोर ‘झोपा काढा’ आंदोलन

    saimat teamBy saimat teamOctober 4, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । शहरामध्ये जवळपास दोन ते तीन वर्षापासून रस्त्यांचे तसेच भूमिगत गटारीचे काम सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची पूर्णत: वाताहात झालेली आहे. त्यातच ऐन पावसाच्या दिवसामध्ये तर जनतेला खराब रस्त्यांमुळे नरक यातना सहन कराव्या लागल्या व लागत आहेत. याबाबत आम्ही आपणांकडे निवेदने दिले असता तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वेळोवेळी आंदोलने करून सुध्दा हे प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. त्या प्रशासनाला उठविण्यासाठी आज सकाळी मनपा इमारतीत ‘झोपा काढू’ आंदोलन मनसे जिल्हा सचिव ॲड.जमिल देशपांडे, मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, जिल्हा संघटक राजेंद्र निकम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

    आपणांकडून आम्हांस सांगण्यात येते की, सद्यस्थितीत म.न.पा.जवळ पैसा नसल्यामुळे रस्त्यांची कामे पूर्ण होऊच शकत नाही, तसेच जी काही वसूलीची रक्कम येते ती रक्कम अमृत योजनेसाठी वापरली जाते, त्यामुळे आमचा नाईलाज झालेला आहे असे उत्तरे आयुक्त साहेबांकडून आम्हांस मिळत आहेत. महोदय, साहेब आपणांकडून अशा उत्तराची आम्हांस आता अपेक्षा नसून आपणाकडे जर रस्त्यांच्या कामासाठी पैसे नसतील तर आपण सुध्दा ऑफीसला का येत असतात ?

    सदरील जळगांव शहरातील रस्त्यांची कामे ज्या संबंधित ठेकेदार/ इंजिनिअर्स यांना दिलेले असले त्यांचा आमच्याशी प्रत्यक्ष संपर्क करुन द्यावा अथवा त्यांचा मोबाईल नंबर आम्हांस द्यावा म्हणजे आम्हा आता त्यांनाच याबाबत जाब विचारणार आहोत. तरी महोदय साहेब आपणास आता आमची हात जोडून नम्र विनंती की, जळगांव शहरातील संपूर्ण रस्त्यांच्या कामांना 10 दिवसाचे आत सुरुवात करावी. या आशयाचे निवेदन देण्यात आले.
    यावेळी जनहित शहर अध्यक्ष संदिप मांडोळे, मनविसे शहराध्यक्ष योगेश पाटील, संदीप महाले, जळगाव शहर संघटक निलेश अजमेरा, तालुका संघटक राजू बाविस्कर, महेश माळी, जळगाव तालुका संघटक गणेश नेरकर, कुणाल पाटील, कुणाल पवार, गोविंद जाधव,विशाल कुमावत, संतोष सुरवाडे, रमेश भोई, मनोज खुळे, निलेश खैरनार, अँड.दिनेश चव्हाण, मंगेश भावे, सिध्देस कवठाळकर, गोरख गायकवाड, संदिप पाटील आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : प्रभाग ५ आरोग्य कार्यालयात महापौरांचा धडाका कर्मचाऱ्यांना शिस्तीचा इशारा

    February 16, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.