लोहाऱ्यात दोन हजार ७० लाभार्थ्यांना मिळाले मोफत गृहोपयोगी साहित्य

0
34

मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते लाभार्थ्यांना संचाचे वाटप

साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे दोन हजार ७० बांधकाम कामगार बंधू, भगिनींना ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मोफत गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप नुकतेच करण्यात आले. यावेळी सर्व लाभार्थी महिला, पुरुष मंडळीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. यावेळी संजय गरूड, भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, संजय पाटील, पालक पदाधिकारी सुहास पाटील, उपसरपंच दीपक खरे, विकासोचे चेअरमन प्रभाकर चौधरी, परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र बांधकाम कामगार अंतर्गंत मोफत घरगुती भांडे, पेट्यांच्या नोंदणीसाठी भडगाव, चाळीसगाव जावे लागत होते. ती सुविधा लोहारा कुऱ्हाड सर्कलमध्ये भाजपाचे कार्यकर्ते कैलास चौधरी, जगदीश तेली यांनी राबविण्यासाठी ना.महाजन यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार ना.महाजन यांनी बांधकाम, कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांना लोहारा कुऱ्हाड सर्कलमधील गावात जाऊन नोंदनी कॅम्प घेत लाभार्थ्यांची होणाऱ्या त्रासापासून सुटका केली. थेट गावातच घरगुती भांडे वाटप ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

तेली समाजातर्फे ना.गिरीष महाजन यांचा विशेष सत्कार

महाराष्ट्र शासनाने तेली समाजाच्या विकासासाठी आर्थिक महामंडळ स्थापन केल्याबद्दल तेली समाजातर्फे ना.गिरीष महाजन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच तेली माळी, पाटील, कोळी, राजपूत समाजासाठी सामाजिक सभागृहाला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना.महाजन यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, सूत्रसंचलन दीपक पवार तर आभार उपसरपंच दीपक खरे यांनी मानले.

प्रभावीपणे योजना राबविणारे महाराष्ट्र एकमेव राज्य

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्व घटकातील प्रत्यक्ष लाभ देणारे व योजना जाहीर करून त्या राबवून दिलेला शब्द पाळत योजना प्रभावीपणे राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी स्वावलंबी करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. विरोधकांजवळ मुद्दे नसल्यामुळे ते हतबल झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात आपण आपला आशीर्वाद आम्हाला द्यावा, असे आवाहन मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here