विमा योजनेच्या लाभार्थ्याला दोन लाखांचा धनादेश प्रदान
साईमत/जामनेर/प्रतिनिधी
शहरातील कल्पना शिवाजी पाटील यांनी स्टेट बँक अंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा स्टेट बँकेतून विमा काढला होता. विम्याची अनुक्रमे वार्षिक रक्कम २० रुपये तसेच ४३६ रुपये अशी होती. दुर्दैवाने कल्पना शिवाजी पाटील यांचे निधन झाले.
त्यांच्या निधनानंतर त्यांचे पती शिवाजी पाटील यांना स्टेट बँकेमार्फत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतून मंजूर झालेली रक्कम दोन लाख रुपयाचा धनादेश नुकताच देण्यात आला. यावेळी शाखा व्यवस्थापक विकास कुमार, सर्विस मॅनेजर दीपक वराडे, तनिया अरोरा, सागर जावंजाळ, प्रियंका कासार उपस्थित होते.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ मिळाल्यामुळे दुःखात हातभार लागला. अशा योजनेमुळे खरोखर गरजू ग्रामीण जनतेला खूप मोठा आधार मिळत आहे. प्रत्येकाने स्वतःचे खाते काढून योजनेचा लाभ घ्यावा, असे आव्हान पंकज घोरपडे, शाखा व्यवस्थापक विकाश कुमार तसेच केंद्र चालक संतोष माळी यांनी केले आहे.