मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या; कारवाई करा

0
29

मुक्ताईनगरातील सकल मुस्लिम समाजाची तहसिलदारांकडे मागणी

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी

यति नरसिंहानंद यांनी प्रेषित हजरत मोहम्मंद (स.) यांचा असहनीय आणि लज्जास्पद शब्द वापरुन अपमान केला आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहे. तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा कृत्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तातडीने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा आशयाचे निवेदन सकल मुस्लिम समाजातर्फे तहसिलदारांमार्फत राष्ट्रपतींना नुकतेच दिले आहे.

निवेदन देतेवेळी मुस्लिम मणियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकिम चौधरी, शकील खाटीक, अफसर खान, शकुर जमादार, कलीम मनियार, रिजवान चौधरी, समद खाटीक, बशीर काजी, अहमद ठेकेदार, हाजीलाल खाॅ, हाशम शाह, जमील बेपारी, खालील खाटीक, शकील मेकॅनिकल, अन्नु शेख यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here