भोळे महाविद्यालयाला क्रॉस कंट्री पुरुष स्पर्धेत मिळाला तृतीय क्रमांक

0
13

भोळे महाविद्यालयाला क्रॉस कंट्री पुरुष स्पर्धेत मिळाला तृतीय क्रमांक

साईमत/भुसावळ/प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विभाग अंतर्गत आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धा पाल रावेर येथे नुकत्याच घेण्यात आल्या. त्यात दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय क्रॉस कंट्री पुरुष संघाने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत १० कि.मी. धावणे अंतर पाल ते गारखेडा व परत पाल असे पूर्ण करून अर्जुन बोयत, उदय पाटील, आशिष वाघ, अजय वानखेडे, पूर्वेश सोनवणे, तुषार नरवाडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

खेळांडूंना प्रा.डॉ.संजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.खेळांडूंच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here