Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»आरक्षण प्रश्नी आदिवासी बनले आक्रमक
    जामनेर

    आरक्षण प्रश्नी आदिवासी बनले आक्रमक

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 30, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पहुरला आदिवासी समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन, पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

    साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी :

    आदिवासी समाजाच्या आरक्षणात इतरांना समाविष्ट करू नये, त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये विशिष्ट समाजाच्या लोकांना समाविष्ट करण्यासाठी गठीत केलेली समिती बरखास्त करून त्या समितीला दिलेले अधिकार रद्द करावेत, यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी एकता विकास समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सोमवारी (ता. ३०)आदिवासी समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्ग तब्बल तासभर रोखल्या गेला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. बसस्थानकाजवळ मोठ्या संख्येने परिसरातील आदिवासी समाज बांधवानी एकत्रित आले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारने आदिवासी समाजाच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा गाठ आदिवासी समाजाशी आहे, असा इशारा आंदोलकांनी दिला.

    पोलीस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक भरत दाते यांच्यासह पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता. मंडळ अधिकारी मृणाल उंबरकर यांना आंदोलक फिरोज तडवी, गयास तडवी, राजू तडवी, सांडू तडवी, शब्बीर तडवी यांच्यासह विविध आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले.

    आंदोलनात या संघटना झाल्या सहभागी

    आदिवासी एकता विकास समिती, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, बिरसा मुंडा क्रांतिवीर आदिवासी श्रमिक संघटना, महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषद, एकलव्य क्रांती संघटना, तडवी आदिवासी एकता मंच, स्व.राम नाईक आदिवासी महासंघ, आदिवासी पारधी महासंघ आदी संघटनांनी आंदोलनात सहभाग नोंदविला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.