अतिक्रमण पथकाला शिवीगाळ करून जाळून घेण्याची दिली धमकी, गुन्हा दाखल

0
25

अमळनेर शहरातील सराफ बाजार भागातील घटना

साईमत/अमळनेर /विशेष प्रतिनिधी :

शहरातील सराफ बाजारात अतिक्रमण काढायला गेलेल्या नगरपरिषदेच्या पथकाला शिवीगाळ करत महिलांनी अंगावर इंधन ओतून घेत स्वतःला जाळुन घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून अमळनेर पोलिसात तक्रार दिली आहे.

नगरपरिषदेचे अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील सराफ बाजार भागातील नागराज भबुतमल चोरडिया यांनी अतिक्रमण केले असल्याने त्यांना नगरपरिषदेने त्यांना वेळोवेळी नोटीस बजावून ही अतिक्रमण काढले नाही. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथक व पोलीस कर्मचारी यांनी २४ रोजी सकाळी ११ वाजता नागराज चोरडिया यांचे अतिक्रमण काढायला सुरुवात केली. त्यावेळी नागराज चोरडिया, त्यांची पत्नी इंदुमती चोरडिया, मुलगा प्रदीप चोरडिया, हेमेंद्र चोरडिया, चेतन चोरडिया, सून किरण चोरडिया, वनिता चोरडिया हे सर्व मिळून तुम्ही हे अतिक्रमण काढू शकत नाही, असे ओरडत जोरजोरात शिवीगाळ करू लागले.

पथक अतिक्रमण न काढता परतले…!

इंदुमती चोरडिया यांनी स्वत:च्या व सुनांच्या अंगावर इंधन ओतून घेवून, ‘तुम्ही जर अतिक्रमण काढले तर जाळून घेवून तुमचे नाव टाकून देवू’ अशी धमकी देवू लागले. पथकाने चोरडिया कुटुंबाला हे कृत्य बेकायदेशीर असून कारवाई होईल, असे सांगूनही त्यांनी शिवीगाळ करणे सुरू ठेवल्याने पथक अतिक्रमण न काढता परतले. शासकीय कामात अडथळा आणुन शिवीगाळ केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास हे.कॉ.प्रमोद बागडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here