कृषी पर्यटन केंद्रातून विद्यार्थ्यांना मिळाली नाविन्यपूर्ण माहिती

0
16

कृषी पर्यटन केंद्रातून विद्यार्थ्यांना मिळाली नाविन्यपूर्ण माहिती

साईमत / जळगाव / प्रतिनिधी
तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटी अंतर्गत वाघूर धरणाच्या कुशीत हिरव्यागार फुललेल्या शिवारात असलेल्या परेश कृषी पर्यटन केंद्रास भेट देऊन विविध वृक्षांची सविस्तर माहिती जाणून घेतली. या क्षेत्रभेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण माहिती मिळाली.

क्षेत्रभेटीत पहिली ते आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

परिसरातील विविध वृक्ष, फळझाडे, फुलझाडे, वेली, वनस्पती, नवनवीन रोपे यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. परेश कृषी पर्यटन केंद्रात असलेल्या विविध निसर्गरम्य ठिकाणांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी तेथील माहिती जाणून घेतली. रोज त्याच त्याच कामात व्यस्त असणाऱ्या लोकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून खास वेळ काढून निसर्गरम्य परिसरात रमण्यासाठी जळगाव शहरापासून थोड्या अंतरावर हे केंद्र आहे.

शेतात जाऊन शेती आणि शेतीविषयक बाबींचा अनुभव घेऊन अभ्यास करणाऱ्या लोकांना आपुलकी आणि स्वच्छ हवा देण्याचा कृषी पर्यटनाचा उद्देश असल्याचे परेश कृषी पर्यटन केंद्राचे संचालक तथा साईमतचे संपादक प्रमोदभाऊ बऱ्हाटे यांनी सांगितले.क्षेत्रभेट यशस्वीतेसाठी कंडारी जिल्हा परिषद शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक तुषार लोहार, संतोष वानखेडे, मंजुषा पाठक, डॉ. जगदीश पाटील, राजाराम पाटील, विनोद जयकर, ज्योती वाघ, सुनंदा रोझदकर, सविता निंभोरे, गणेश तांबे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here