प्रभाग क्रमांक ९ मध्ये पालिकेचा भूखंड हडपण्याचा प्रयत्न

0
19

स्थानिक रहिवाशांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले हरकतीचे निवेदन

साईमत।पाचोरा।प्रतिनिधी।

गेल्या दहा वर्षांपासून प्रभाग क्रमांक ९ मध्ये विकासाची कामे थांबलेली आहेत. त्यातच प्रभागात काही स्थानिक समाज बांधवांनी खुल्या भूखंड हडप करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी आक्षेप नोंदवत मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना हरकतीचे निवेदन दिले आहे.

पाचोरा नगर पालिका हद्यीतील अकृषक सर्वे नं. ४३/१/अ/१ब मध्ये शेकडो प्लॉट धारक आहेत. नगर परिषदेने भुखंडातील खुला भुखंड हा विकसित करण्याचे ठरविले आहे. तो नगरपरिषदेने विकसित करावा. जागेवर भुखंड हा कोणत्याही जाती-धर्मातील व्यक्तींना दिला जावू नये, त्यावर कोणत्याही स्वरूपाचे धार्मिक मंदीर, मस्जीद, स्तुप, वगैरेसाठी देण्यात येवू नये. भुखंड हा काही व्यक्ती तेथील नागरिक असल्याचे व प्लॉटधारक असल्याचे भासवुन खोट्या स्वाक्षऱ्यांचा आधार घेवून हडप करण्याच्या प्रयत्नात आहे.त्या ठिकाणी नागरिकांना गार्डन, सकाळ व सायंकाळी फिरण्यासाठी वाॅकिंग पार्क अथवा ऑक्सिजन पार्क करून वृक्षारोपण करण्यात यावे. खुल्या भुखंडात कोणत्याही प्रकाराचे स्टेज बनवु नये. अकृषक सर्वे नं. ४३/१/अ/१ब हा विकसित करावा, अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना दिले आहे.

आ.किशोर पाटील यांचे दुर्लक्ष

जुना अंतुर्ली रोड भागात नव्याने वास्तव्यास आलेल्या अमृतनगर भागात आ. किशोर पाटील यांचे विकास कामांकडे दुर्लक्ष झाले आहे. या भागातील समस्यांबाबत अनेकवेळा स्थानिक नागरिकांनी आ. पाटील यांच्या भेटी घेवून समस्यांचा पाढा वाचला आहे. मात्र, अद्यापपर्यंत या भागात भुयारी गटारी, रस्ते, पथदिवे, घंटागाडी अशा नागरी मुलभूत सुविधा मिळत नसल्याने स्थानिक रहिवाश्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here