Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»अमळनेरात महिलेचा निर्घृण खून
    अमळनेर

    अमळनेरात महिलेचा निर्घृण खून

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एलसीबीच्या पथकाकडून तपासाला सुरुवात

    साईमत।अमळनेर।प्रतिनिधी।

    शहरातील गांधलीपुरा भागात राहणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी, २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून गुन्ह्याचा शोध घेण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. शीतल जय घोगले (वय २८, रा. गांधलीपुरा, अमळनेर) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    सविस्तर असे की, अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील एका मोकळ्या जागेच्या आवारात शीतल घोगले या महिलेचा मृतदेह रविवारी, २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आढळून आला. तिच्या गळ्याला आवळल्याचे व्रण असून डोक्याला व हातावर वार केल्याचे दिसून आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्यासह अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह अमळनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात रवाना केला.

    तपासाची चक्रे फिरविण्यास सुरूवात

    हा खून नेमका कुणी व कोणत्या कारणासाठी केला आहे. त्याची माहिती मिळालेली नाही. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रवी पाटील, दीपक माळी, संदीप पाटील यांनी तपासाची चक्रे फिरविण्यास सुरूवात केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना

    March 1, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात घरफोडीची घटना; कोल्हे नगरातून ४० हजारांचा ऐवज लंपास

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.