घरात सर्पदंश झाल्याने ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू

0
30

यावलला साने गुरुजी विद्यालयाजवळ घडली घटना

साईमत/यावल/प्रतिनिधी :

शहरातील गाडगेनगर भागात राहणाऱ्या एका महिलेला तिच्या घरात विषारी सापाने दंश केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी, २२ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सविस्तर असे की, येथील यावल नगरपरिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पाठीमागील गाडगेनगर वस्तीत राहणारी निर्मलाबाई शंकर वडर (वय ५६) यांना रविवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातच त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या मध्यभागी विषारी सापाने दंश केला. तेव्हा त्या तात्काळ बेशुद्ध पडत्या.कुटूंबातील मंडळीच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांना रहिवाशांनी तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉ.प्रशांत जावळे यांनी तपासणी करून सर्पदंश झालेल्या निर्मलाबाई वडर यांना मृत झाली असल्याची सांगितले.

अकस्मात मृत्यूची नोंद

मयत निर्मलाबाई वडर यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेची माहिती मयत महिलेच्या मुलगा रवींद्र शंकर वडर (वय ३०) यांने यावल पोलीस स्टेशनला दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.राजेंद्र पवार करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here