जामनेरला इंदिराबाई ललवाणी विद्यालयाच्या श्रीगणरायांचे विसर्जन
साईमत।जामनेर।प्रतिनिधी।
इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय गणेशोत्सवानिमित्त सातव्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात आला. सुरवातीस श्री आरती तथा पूजन इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सचिव किशोर महाजन, संचालक गुरुजी विष्णू पाटील, संजय महाजन, के.व्ही.महाजन, भगवान बेनाडे, मुख्याध्यापक एस.आर.चव्हाण, उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, पर्यवेक्षक प्रा.के.डी.निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी.जी.अत्तरदे, ज्येष्ठ शिक्षक प्रा.डी.झेड.गायकवाड, कला समन्वयक प्रा.विजय पाटील, शालेय सांस्कृतिक समिती अध्यक्षा प्रा.सविता महाजन तथा सर्व शिक्षक बंधू भगिनी तथा शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी गणेश भक्तांची उपस्थिती होती. त्यानंतर डीजेच्या तालावर सर्व विद्यार्थ्यांनी नाचत गाजत बाप्पांना विसर्जन मिरवणुकीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
वाघूर बॅक वॉटर, हिवरखेडे येथे विसर्जन प्रसंगी पर्यवेक्षक प्रा.के.डी.निमगडे, प्रा.दिनेश महाजन, प्रा.सुमित काबरे, प्रा.संजय क्षीरसागर, क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार, प्रा.सोनूसिंग पाटील, प्रा.राजेश खडके, प्रा.कोमलसिंग परिहार, प्रा.योगेश पोळ, प्रा.रवींद्र शेले, प्रा.सतीष क्षीरसागर, शिक्षकेत्तर कर्मचारी हरीश साळुंखे, निलेश पाटील, किशोर पाटील, राहुल काळे, निलेश चौधरी, रुपेश पाटील आदींच्या उपस्थितीत बाप्पांना शेवटचा निरोप दिला.