रक्षाबंधनाचे औचित्य साधून आ. किशोर पाटील यांच्याकडून ‘लाडक्या बहिणीला’ अनोखी भेट

0
19

‘एक घर एक साडी’ मोहिमेद्वारे विविध भागात साड्यांचे वाटप

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

पाचोरा-भडगाव तालुक्यासह पाचोरा शहरात रक्षाबंधनाचे औचित्य साधून आ. किशोर पाटील यांच्याकडून ‘लाडक्या बहिणीला’ अनोखी भेट म्हणून साडी वाटप करण्यात येत आहे. ‘एक घर एक साडी’ या पद्धतीने पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये राष्ट्रमाता नगर, मुकुंद नगर, वृंदावन नगर, पवन नगर, चिंतामणी कॉलनी, जय किसान सोसायटी, दत्त कॉलनी, जयराम कॉलनी, साने गुरुजी कॉलनी, मल्हार नगर, शांतीनगर, लक्ष्मीबाई वाघ नगर, सावित्रीबाई नगर, जिजामाता दुर्गा नगर, भवरलाल नगर, गजानन महाराज ठाकरे नगर, श्री कृपा कॉलनी, आनंद नगर, स्वामी समर्थ नगर अशा विविध भागात ‘एक घर एक साडी’ देण्यात आली आहे.

काही भाग बाकी आहे. उर्वरित राहिलेल्या भागात साडीचे वाटप करण्यात येणार आहे. साडी वाटपाच्या मोहिममध्ये बंडू केशव सोनार, वैभव पाटील, जितू पेंढारकर, नितीन चौधरी, किशोर पाटील, नितीन जाधव, निकिता राणा, अनिल बछवा यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here