Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»पाळधीला एसटी महामंडळाच्या बसला थांबा द्या
    जामनेर

    पाळधीला एसटी महामंडळाच्या बसला थांबा द्या

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 10, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ग्रामस्थांनी दिले जळगाव विभाग नियंत्रकांना निवेदन

    साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी :

    येथूनच जवळील पाळधी गावात जलद, अति जलद एस.टी.महामंडळ बसला थांबा असल्यावरही बस थांबत नसल्यामुळे विभाग नियंत्रक यांना ग्रामस्थांनी बस थांबा द्यावा, अशा आशयाचे नुकतेच निवेदन दिले. यावेळी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम महाजन यांच्या सहकार्याने विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांची भेट झाली. यावेळी निवेदन देताना पाळधी गावातील ज्येष्ठ मंडळी, तरुण उपस्थित होते.

    जामनेर तालुक्यातील पाळधी गाव छत्रपती संभाजी नगर ते जळगाव महामार्गावर आहे. यापूर्वीपासून जलद व अति जलद गाड्यांना थांबा आहे. परंतु आता वाहक व चालक यांच्या मनमानी कारभाराला ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, शालेय शिक्षणासाठी जिल्ह्यावर येत असलेले तरुण-तरुणी यांना रोज अपमान सहन करावा लागतो. एसटीत चढू पण देत नाहीत. चढलेच तर जळगाव बाहेर कुठेही बस थांबवून बळजबरीने उतरवून दिले जाते. चालकासह वाहक ग्रामस्थांशी ही कोणती पद्धत वापरत असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

    ग्रामस्थांतर्फे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

    महाराष्ट्र शासनाचा ‘हात दाखवा, एसटी थांबवा’ हा नारा पाळधीत लागू पडत नाही. कारण गाडीला आडवे झाल्यावरही चालक बस थांबवत नाही. त्याचे गांभीर्य जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी घ्यावे, अन्यथा ग्रामस्थांतर्फे रास्ता रोको आंदोलन केले जाईल. त्याला सर्वस्वी जबाबदार जळगाव राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय राहील.परंतु विभाग नियंत्रक जगनोर यांनी तात्काळ पाळधी गावांसाठी १५ दिवसांसाठी १ व्यक्ती कंट्रोल म्हणून नेमणूक करून बस स्थानक परिसरात फलक बसविण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.