Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पाचोरा बाजार समितीत सभापती गणेश पाटील यांच्या हस्ते सपत्नीक गणरायाची स्थापना
    पाचोरा

    पाचोरा बाजार समितीत सभापती गणेश पाटील यांच्या हस्ते सपत्नीक गणरायाची स्थापना

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 9, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बाजार समिती समाजहिताचे उपक्रम राबविण्यासाठी एकजुटीने सक्रीय

    साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

    कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे सर्व जाती – धर्मीय मिळून एकत्रित असलेला परिवार आहे. त्यामध्ये पाचोरा मार्केट यार्ड व्यापारी असो., पाचोरा मार्केट यार्ड आडत असो., हमाल-मापाडी पुरुष व महिला कामगार संघटनासह कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी वर्षभर धार्मिक व समाज हिताचे उपक्रम राबविण्यासाठी एकजुटीने सक्रीय असतात. अशा उपक्रमांसाठी पाचोरा बाजार समितीचे सभापती, उपसभापती पी.ए. पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ प्रोत्साहन देतात. असा उपक्रम यावर्षापासून गणेशोत्सोव प्रारंभ करण्याची कल्पना सुचली आणि त्याचे अध्यक्षस्थान व्यापारी असो.चे अध्यक्ष सचिन येवले यांना देण्यात आले. त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपरोक्त सर्व असो.संघटना यांना विश्वासात घेऊन गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्याचे निश्चित करून पाचोरा बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सचिव, संचालक मंडळ यांच्यासमोर मांडली. तेव्हा सर्वांनी एकमताने होकार देत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासित केल्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी समितीच्या आवारात गणेशाची सभापती गणेश पाटील, त्यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते शनिवारी प्रतिष्ठापना करण्यात आली.

    पाचोरा-भडगाव बाजार समितीतीच्या उत्पन्नात भरघोस वाढ व्हावी, सोबत बाजार समितीशी संलग्न असलेले शेतकरी व्यापारी मजुर कामगारांसह सर्व घटक सुजलाम्‌-सुफलाम्‌ व्हावे, सोबत सर्व विकास कामे निर्विघ्न व चांगली व्हावी, यासाठी सभापती गणेश पाटील यांनी गणरायाकडे प्रार्थना केली.

    यांची होती उपस्थिती

    यावेळी संचालक मनोज सिसोदिया, सचिव बी. बी. बोरुडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन येवले, प्रतिक मोर, योगेश संघवी, अविनाश गौड, ज्येष्ठ व्यापारी प्रकाश पटवारी, सुकदेव पाटील, चंद्रकांत कोठावदे संघटनासह बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.