लोहाऱ्यातील डॉ.जे.जी.पंडित विद्यालयातील विद्यार्थी बनले ‘शिक्षक’

0
32

शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार

साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी :

धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीद्वारा संचलित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावली. त्यांनी शिक्षकांच्या तासिका घेतल्या. त्यानंतर शिक्षक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

यावेळी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.जे.जी.पंडित, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्यावतीने विद्यालयातील सर्व शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यार्थी, शिक्षकांनी दिवसभरातील कामकाजाचे अनुभव मांडले. त्यात सुमित क्षीरसागर, खुशी गोंधळे, भाग्यश्री हडप यांचा समावेश होता. शिक्षक दिन तसेच सर्व कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी केलेे होते. त्याबद्दल विद्यालयाच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले. सूत्रसंचालन ऋषभ क्षीरसागर, दिव्या देशमुख, रिया चौधरी या विद्यार्थिनी शिक्षकांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here