जामनेरला रक्तदान शिबिराला तालुकाभरातून लाभला उदंड प्रतिसाद

0
55

शिबिरात ३१ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने केले रक्तदान, मान्यवरांकडून कौतुक

साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

जामनेर तालुका महाराणा उत्सव समिती, जामनेर तालुका केसरीया प्रतिष्ठान, प्रवीणसिंह पाटील, राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग टीम, राजपुताना महिला ग्रुप, जामनेर तालुका, पिंपळगाव गोलाईत येथील वसुंधरा फाउंडेशन यांच्यावतीने रेड प्लस रक्तपेढीकडून जामनेर येथील द्वारकाधीश हॉस्पिटल येथे महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदान शिबिराला तालुकाभरातून उदंड प्रतिसाद लाभला. शिबिरात जामनेर तालुक्यातील ३१ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. ३१ जणांच्या या सामाजिक योगदानामुळे अनेकांच्या जीवाचा धोका टाळणार आहे, हीच भावना उपस्थितांच्या मनामध्ये होती. विशेष म्हणजे  शिबिराला महिला वर्गाचाही उदंड प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाला प.पू. श्याम चैतन्य महाराज, जामनेरच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन, जामनेर तालुका एज्युकेशन सोसा.चे सचिव जितेंद्र पाटील, प्रवीणसिंह पाटील (जळगाव), भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, शंकर पहेलवान, पं.स.चे माजी उपसभापती नवलसिंह पाटील, विठ्ठल मोरे (जळगाव), भगवानसिंह खंडाळकर (जळगाव), ईश्वरसिंह जाधव (जळगाव) आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक उपक्रमाचे कौतुक

यावेळी प.पू.श्याम चैतन्य महाराज यांनी सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत अशा प्रकारच्या रक्तदान शिबिरातून गरजू लोकांना वेळोवेळी मदत झाली पाहिजे, ही भावना व्यक्त केली. नगराध्यक्षा साधना महाजन यांनी महिलांच्या उपस्थितीबद्दल कौतुक केले. महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी फोनवरून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी चंद्रकांत बाविस्कर, नवलसिंह पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

आयसीयू सेंटर लोकांच्या सेवेसाठी सज्ज

शिबिरासाठी एमडी. मेडीसीन डॉ.दिनेशसिंग पाटील (द्वारकाधीश हॉस्पिटल) यांनी आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे आय.सी.यू.सेंटर उपलब्ध करून दिले होते. हे आय. सी. यू. सेंटर लोकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. शिबिरास दिवसभरातून जामनेर शहरामधील सर्वच डॉक्टरांनी उपस्थिती दिली. याप्रसंगी डॉ.दिनेशसिंग पाटील यांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा उद्योजक प्रवीणसिंह पाटील यांचा सत्कार केला. विलाससिंह पाटील (मुक्ताईनगर), व्ही.ए.पाटील (पाचोरा) यांनी शिबिरासाठी मार्गदर्शन केले.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी महाराणा उत्सव समिती, केसरीया प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची टीम, वसुंधरा फाउंडेशनचे सर्व सदस्य तसेच राजपुताना महिला ग्रुपच्या सर्व महिला भगिनी यांनी परिश्रम घेतले‌. ‌ प्रास्ताविक डॉ. विश्वजीत सिसोदिया तर आभार केसरीया प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डी.एस.पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here