पोळा सणावर पसरले दुःखाचे सावट
साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी
पोळा सणासाठी बैलाची तयारी करत असताना बैलाखाली दबल्याने शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू झाल्याची दुर्घटना पहूर कसबे येथे शनिवारी (ता. ३१)दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत असून पोळा सणावर दुःखाचे सावट पसरले आहे. रविवारी, १ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. याप्रकरणी पोलिसात माहिती देण्यात आली आहे.
पहुर कसबे येथील शेतकरी विठ्ठल देवचंद भडांगे (वय ६२) हे त्यांच्या खर्चाणे रस्त्यावरील माणकी शिवारातील शेतात पोळा सणासाठी बैलाची तयारी करत होते. बैलाच्या शिंगांचा जुना रंग काढत असताना
बैलाखाली दबल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.