Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»मुक्ताईनगरला मुस्लिम मनियार बिरादरीत घडला ‘आदर्श विवाह’
    मुक्ताईनगर

    मुक्ताईनगरला मुस्लिम मनियार बिरादरीत घडला ‘आदर्श विवाह’

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 29, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सैय्यद कुटुंबियांचा ऐतिहासिक निर्णय

    साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :

    येथील सिड फार्ममधील रहिवासी सैय्यद रौशन सैय्यद रौनक यांनी त्यांचा मुलगा सैय्यद जाहीदसाठी मुलगी पाहत असताना त्यांना बऱ्हाणपूर येथील राहणारे तथा हल्ली मुक्ताईनगर येथील रहिवासी शेख सईद शेख जब्बार यांची मुलगी अरबीना ही त्यांच्या मुलाला आवडली. दोघां कुटुंबानी एकमेकांना समजुन घेतल्यानंतर गुरुवारी, २९ ऑगस्ट रोजी साखरपुडा (मंगणी) करण्याचे ठरले होते. परंतु मुलीचे आजोबा व आजी यांनी मुक्ताईनगर मन्यार बिरादरीचे पंच कलीम मनियार जिल्हा उपाध्यक्ष हकिम आर.चौधरी यांच्याशी चर्चा केली. साखरपुडाऐवजी लग्न (निकाह) करा, असे त्यांनी सांगितले.

    मनियार बिरादरीचे उपाध्यक्ष हकिम चौधरी, मनियार मस्जिद ट्रस्टचे कलीम मनियार, अहमद ठेकेदार यांनी दोन्ही नातेवाईकांशी लग्नाबाबत सविस्तर चर्चा केली.मनियार बिरादरीच्या पंच मंडळीनी दोघांना ईस्लामाचे अंतीम प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनाबद्दल सांगितले. लग्न कशा पध्दतीने करावे, याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर दोघां कुटुंबांनी निर्णय घेतला की, हेच साखरपुडा हेच लग्न करण्यास तयार झाले. ना जेवण… ना दहेज… ना अहेर… ना भेट वस्तु…तसेच मनियार मस्जिदचे मौलाना मुबशीर अहमद यांनी असरची नमाज केल्यानंतर मन्यार मस्जिदमध्ये निकाह अत्यंत साध्या पध्दतीने फक्त “खजुर” वर (निकाहची सुन्नत अदा करण्यात आली) लग्न लावण्यात आले. नवरा सैय्यद जाहीद आणि नवरी अरबीना विवाह बंधनात अडकले.

    विवाह सोहळ्यात नवरदेवकडचे २५ आणि नवरीकडील २० मंडळी (पाहुणे) उपस्थित होते. तसेच फक्त खजुर देऊन लग्न लावण्यात आले. ह्यावेळी नवरदेवकडून पंच म्हणून शेख मुश्ताक शेख अमीर (रा.रावेर) आणि शेख मुश्ताक शेख हुसैन (रा.मलकापूर), सैय्यद साबीर सैय्यद करीम, शेख जहीर शेख खलील (पाळधी) उपस्थित होते.

    लग्नात (निकाह) नवरीचे आजोबा शेख युसुफ शेख हसन, शेख अय्युब शेख.हसन तसेच नवरदेवकडून वकील म्हणून शेख अस्लम शेख कादर (रा.भुसावळ) उपस्थित होते. नवरदेवाचे आजोबा सैय्यद रौनक, शेख हारुन शेख हसन, नवरदेवाचे काका सैय्यद मुन्ना, सैय्यद जमील, नवरीचे मामा शेख वसीम शेख युसुफ, शेख इमरान शेख युसुफ, शेख इरफान शेख युसुफ, शेख मोहसीन शेख युसुफ, शेख गुफरान शेख युसुफ उपस्थित होते. शेवटी मनियार बिरादरीचे हकिम चौधरी (जिल्हा उपाध्यक्ष, मनियार बिरादरी), कलीम हाजी रसुल मनियार (मुतवल्ली मनियार मस्जिद ट्रस्ट, मुक्ताईनगर), खजिनदार अहमद शेख यासिन मनियार, अकील मनियार यांनी तसेच जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीचे जिल्हाध्यक्ष फारुख शेख यांनीही नवरदेवासह नवरीच्या वडिलांना शुभेच्छा दिल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर शेतकऱ्यांचा महामार्गावर उग्र रस्ता रोको आंदोलन

    February 3, 2026

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.