Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मानराज पार्कजवळील अपघातामुळे परिसरात हळहळ, कुटुंबियांचा आक्रोश
    जळगाव

    मानराज पार्कजवळील अपघातामुळे परिसरात हळहळ, कुटुंबियांचा आक्रोश

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 28, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चिमुरड्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ केले दाखल, ट्रक चालकाला घेतले ताब्यात

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका सुरु असतांना खोटे नगर परिसरातील वाटिकाश्रमाजवळील द्वारकाई अपार्टमेंटकडून जळगाव शहरात बाजारासाठी जात असलेल्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने एका महिलेसह १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला एक तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना मानराज पार्कजवळ बुधवारी, २८ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला घटनेची नोंद केली आहे. दरम्यान, धडक देणारा ट्रक हा न थांबता घटनास्थळावरून पसार झाला होता. त्याला नशिराबाद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी नशिराबाद गावाजवळ ताब्यात घेतले आहे. पायल उर्फ खुशी देवेंद्र जलंकर (वय १७) आणि दिक्षिता राहूल पाटील (वय २७, दोन्ही रा. द्वारकाई अपार्टमेंट, वाटिकाश्रम, जळगाव) असे मयत दोघांची नावे आहेत. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चिमुरड्याला उपचारार्थ दाखल केले आहे.

    सविस्तर असे की, द्वारकाई अपार्टमेंट येथे पायल जलंकर ही आई, वडील, लहान भाऊ यांच्यासह राहत होती. याच अपार्टमेंटमध्ये दिक्षिता पाटील या विवाहिता माहेरी आलेल्या होत्या. दिक्षिता पाटील ह्या नाशिक येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या वडीलांच्या नातेवाईकांचे निधन झाले होते. त्यामुळे गेल्या १० दिवसांपासून माहेरी आलेल्या होत्या. या अपार्टमेंटमध्ये राहणारे निलेश पाटील यांना मुलगा झाला होता. त्यामुळे मुलाला पाहण्यासाठी दिक्षिता पाटील या तीन वर्षाचा मुलगा रूद्रा आणि पायल जलंकर यांच्यासोबत बुधवारी दुचाकीने (क्र. एमएच १८ एएस ५३७९) हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाल्या होत्या.

    खोटे नगरकडून जळगाव शहराकडे येत असतांना मानराज पार्कजवळील पुलाच्या उतरतीवर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक देवून दोघांना चिरडले. अपघातात दिक्षिता आणि पायल या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला रूद्र हा गंभीर जखमी झाला. ही घटना नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. दोघांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

    आ. राजूमामा भोळे यांनी भेट देऊन कुटुंबियांना दिला धीर

    माजी महापौर जयश्री महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शासकीय रुग्णालयात आ. राजूमामा भोळे यांनी भेट देऊन कुटुंबियांना धीर दिला. यावेळी त्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर उपस्थित होते. दोघांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. त्यांची ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. अपघात घडल्यानंतर पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील, हेमंत निकम, दीपक राव यांनी सहकार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव प्रभाग ७ मध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती भीती, नगरसेविकांची महापौरांकडे तातडीची मागणी

    March 2, 2026

    Jalgaon:महापालिकेत नवीन जेसीबी व अग्निशमन वाहनांचा समावेश

    March 2, 2026

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.