तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा सत्कार
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी अंतर्गत उपकेंद्र नांद्रा येथे नुकताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेश पाटील, डॉ.कोमल देसले, सीएचओ डॉ. गिरीष पाटील, डॉ. फिरोज शेख, डॉ.नामदेव पाटील उपस्थित होते. ग्रामस्थांच्यावतीने डॉ.राजेश सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा दिवाकर पाटील, माजी पोलीस पाटील आप्पासाहेब रघुनाथ पाटील, भगवान पाटील, नवल वाघ, संतोष गांगुर्डे यांनी शाल, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ.संदीप कुमावत, डॉ.मोहित कुमार जवरे, बशीर पिंजारी, आशा कुवटे, आरोग्य सहाय्यक दिनकर माळी, सोपान राठोड, आरोग्य सेवक रवींद्र सूर्यवंशी, गणेश पाटील, संदीप सावकारे यांच्यासह ग्रामस्थ आरोग्य विभागाचे सर्वच कर्मचारी स्टॉप उपस्थित होते. यावेळी उपकेंद्राची पाहणी करून डॉ.राजेश सोनवणे यांनी समाधान व्यक्त केले.