Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»जाहीर व्याख्यानातून समाजात जनजागृती होऊन सकारात्मक विचारांचा प्रसार होतो : डॉ.कुंदन फेगडे
    यावल

    जाहीर व्याख्यानातून समाजात जनजागृती होऊन सकारात्मक विचारांचा प्रसार होतो : डॉ.कुंदन फेगडे

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 23, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ह.भ.प. शिरीष महाराज व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

    साईमत/यावल/प्रतिनिधी :

    जाहीर व्याख्यानातून समाजात जनजागृती होऊन सकारात्मक विचारांचा प्रसार होतो, असे प्रतिपादन डॉ.कुंदन फेगडे यांनी केले. येथील श्री महर्षी व्यास मंदिर सभागृहात संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज यांचे जाहीर व्याख्यान झाले. व्याख्यानाचा लाभ अनेक भाविक श्रोते नागरिकांनी घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आयोजक म्हणून डॉ.कुंदन फेगडे समारोप प्रसंगी बोलत होते.

    डॉ.कुंदन फेगडे (अध्यक्ष, आश्रय फाउंडेशन, जळगाव जिल्हा सरचिटणीस – भाजपा वैद्यकीय आघाडी) यांच्या पुढाकाराने ह.भ.प.शिरीष महाराज यांचे भव्य जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास तालुक्यातील भक्त आणि संत साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शिरीष महाराजांनी आपल्या प्रवचनात संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा आणि अध्यात्मिक वारसाचा मोलाचा संदेश दिला. समाजप्रबोधन आणि अध्यात्मिक जागृती मुद्द्यांवर त्यांनी विशेष भर दिला. व्याख्यानात श्रोत्यांनी उत्साहाने महाराजांचे विचार आत्मसात केले. कार्यक्रमाला यावल परिसरातील मान्यवर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

    यांची लाभली उपस्थिती

    यावेळी विजय महाराज, संचित महाराज, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, हेमराज फेगडे, संजय फिरके, डॉ.जागृती फेगडे, प्राचीताई पाठक, भूषण फेगडे, रितेश बारी, उज्ज्वल कानडे, सचिन कोळी, कोमल इंगळे, सागर इंगळे, विनीत सोनवणे, मनोज बारी, धनराज कोळी, सागर लोहार यांच्यासह परिसरातील वारकरी, भजनी मंडळ, नागरिक उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.