लोहाऱ्यात महिलांनी फटाके फोडून केले ‘लाडकी बहीण’ योजनेचे स्वागत

0
120
module:1facing:0; ?hw-remosaic: 0; ?touch: (-1.0, -1.0); ?modeInfo: ; ?sceneMode: Hdr; ?cct_value: 5600; ?AI_Scene: (-1, -1); ?aec_lux: 157.93298; ?hist255: 0.0; ?hist252~255: 0.0; ?hist0~15: 0.0; ?module:1facing:0; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Hdr; cct_value: 5600; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 157.93298; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;

जामनेरच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी घेतली महिलांची भेट

साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी :

येथील महिलांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचे फटाके फोडून स्वागत केले. तसेच जामनेरच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी महिलांची भेट घेत विविध योजनांच्यासंदर्भात महिलांशी दिलखुलासपणे चर्चा केल्या. ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे अकाऊंटवर जमा होत असल्याने महिलांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. महायुती सरकार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, साधना महाजन यांचे आभार मानले. विरोधक करीत असलेल्या अफवांना महिलांनी बळी पडू नये, सलग पाच वर्ष महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होतील, असे साधना महाजन यांनी सांगितले.

जामनेर मतदार संघ हा आपला परिवार आहे. त्यामुळे नक्कीच लोहारा नगरीशी माझे नाते घट्ट जोडलेले आहे. म्हणून तुमच्या सुख-दुःखात आम्ही सतत न चुकता हजर राहतो. तुमच्यासारख्या प्रेमळ बहिणींची भेट झाली, हे पाहून आनंद होत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच कुणीही महिला सार्वजनिक विभागाच्या योजनेसाठी धावपळ करू नये. सर्व लाभ तुमच्या गावी उपलब्ध होतील, असेही साधना महाजन यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते छगन झाल्टे, पाचोरा पंचायत समितीच्या उपसभापती अनिता चौधरी, उपसरपंच दीपक खरे, ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, संभाजी चौधरी, संजय पाटील, अतुल कोळी, दीपक पवार, यांच्यासह सर्व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here