विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून अनोखी रक्षाबंधन साजरी
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी:
‘माझी वसुंधरा’ उपक्रमातंर्गत जरंडी ग्रामपंचायतीच्यावतीने शाळेतील चिमुकल्यांनी झाडांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली.निसर्गाशी असलेले माणसाचे अनोखे नाते स्पष्ट करताना हुतात्मा स्मारक येथे लावण्यात आलेल्या झाडांना शाळेच्या विद्यार्थ्यांनी राखी बांधून अनोखी रक्षाबंधन साजरी केली आहे. त्यांनी रक्षाबंधनातून पर्यावरणाचा संदेश दिला आहे.
सर्व राख्या टाकाऊ वस्तूंपासून मुलांनी पालकांच्या मदतीने तयार केल्या होत्या. त्यातील काही राख्या झाडांना बांधण्यात आल्या. झाड आपणाला ऑक्सिजन, सावली, फळे, फुले देते. त्यामुळे तोच खरा माणसाचा आधार आहे. त्याची जाणीव ठेऊन झाडालाच भाऊ समजून राखी बांधली, असे चिमुकल्यांनी सांगितले.
यावेळी सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच संजय पाटील, ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे, लिपिक संतोषकुमार पाटील यांच्यासह ग्रा.पं.चे सदस्य उपस्थित होते.