Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण
    कृषी

    शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी:

    महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकीय अन्नधान्य साठवणूक विभाग आणि गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जवळपास १०० च्यावर झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमासाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहकार्य लाभले. याप्रसंगी एफसीआयचे विभागीय व्यवस्थापक जगजितसिंग मारतोनिया, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे साठा अधीक्षक (स्टोरेज सुपरिटेंडन्ड) महेश ढाके, साठवणूक विभागाच्या सहाय्यक अधिक्षक अर्चना मेढे, एल. एम. पवार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मदन लाठी, सुधीर पाटील, जैन इरिगेशनचे देवेंद्र पाटील उपस्थित होते.

    गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जैव विविधत जपता यावी, यासाठी वृक्षारोपणासह संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. या सृजनशील उपक्रमात जळगाव हरित करण्याचा संकल्प घेण्यात आला आहे. प्रास्ताविकात मदन लाठी यांनी उपक्रमाविषयी सांगितले. सुधीर पाटील यांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा दिली.

    अर्चना मेढे यांनी गांधी रिसर्च फाउंडेशतर्फे मागीलवर्षी लावलेल्या झाडांपैकी ७० टक्के झाडे जोपासली आहे. एफसीआयचे विभागीय व्यवस्थापक जगजितसिंग मारतोनिया यांनी वृक्षारोपण करुन ते जगविण्याचे आवाहन केले. तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यात सहभागी होता आल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे उमेश सूर्यवंशी, जितेंद्र पाटील, वखार महामंडळाच्या शोभा सोनवणे यांच्यासह सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव प्रभाग ७ मध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती भीती, नगरसेविकांची महापौरांकडे तातडीची मागणी

    March 2, 2026

    Jalgaon:महापालिकेत नवीन जेसीबी व अग्निशमन वाहनांचा समावेश

    March 2, 2026

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.