100 सीड्स बॉल थ्रो आऊट करून क्लबच्या सदस्यांनी केले वृक्षारोपण
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
पाटणादेवी ट्रिप आणि सीड्स बॉलच्या माध्यमातून वृक्षारोपण प्रोजेक्ट यशस्वीरित्या नुकताच राबविण्यात आला. सुरुवातीलाच क्लब डिस्ट्रिक्ट आयसो योगिता बंग यांनी लिंबू पाणी एनर्जी ड्रिंक दिले. अतिशय जोशात नियमबद्ध पद्धतीने सर्व मैत्रिणी उपस्थित राहिल्या.
क्लबच्या सीसी मोहिनी कापडणे यांनी सीड्स बॉल प्रोजेक्ट सुचविला. त्याला अनुसरून सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनिअर दिनेश देशमुख, सामाजिक वन्य जीव विभागाचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अशोक मोरे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कोतकर आणि वनविभाग कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी बनविलेले 100 सीड्स बॉल पायवाटेने निसर्ग रम्य वातावरणात थ्रो आऊट करून क्लबच्या सदस्यांनी वृक्षारोपण करण्यास सहकार्य केले.क्लब अध्यक्षांनी त्यांना पुस्तके देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच दिनेश देशमुख यांनी क्लबच्या चार्टर प्रेसिडेंट डॉ.मिनाक्षी करंबळेकर यांचे आभार मानले.
कन्नड येथील अग्नेज इंटरनॅशनल स्कुलच्या मुलांनी वृक्षारोपण प्रकल्पामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला. क्लब अध्यक्षांनी आजची पिढी शालेय विद्यार्थ्यांना क्लबचे महत्व आणि राबविले जाणारे प्रकल्प थोडक्यात समजावून सांगितले. यावेळी मेघा बक्षी यांनी सुंदर गेम घेऊन विजेत्यांना बक्षीस तसेच ‘फ्रेंडशिप डे’निमित्त कॅडबरी दिली. राधिका शामा पूजा यांनी फ्रेंडशिप बँड बांधले. तसेच क्लब अध्यक्ष सुनीता बोरा आणि सचिव चैताली मांडे यांनी सदस्यांना फ्रेंडशिप बँड बांधून मैत्रीचे बंधन साजरे केले. माजी सेक्रेटरी जागृती दवे यांनी गाडीचे नियोजन केले होते.
पावसात घेतला सहलीचा आनंद
निसर्गाच्या सुंदर वातावरणात लक्ष्मी खत्री, जागृती दवे, शारदा गुप्ता, अमृतकर, रूपाली निकुंभ, मोहिनी कापडणे, सुजाता अग्रवाल, संध्या बुंदेलखंडी, ज्योती करवा, योगिता बंग, पूजा लोढा, राधिका शर्मा, श्यामा शर्मा, उज्वला ठोंबरे, लीना फडतरे, निगार चव्हाण, प्रतिभाताई पवार, मेघाबक्षी, मीनाक्षी करंबळेकर, मोहिनी कापडणे, चैताली मांडे, सुनिता बोरा अशा सर्व इनरव्हील मैत्रिणींनी आणि प्रोजेक्टचा आणि त्याचबरोबर फ्रेंडशिप डे आणि पावसात सहलीचा आनंद घेतला.