
चालक, वाहकाचा सत्कार, पाचोरा आगार प्रमुखांचे मानले आभार
साईमत/ न्यूज नेटवर्क/ लोहारा, ता.पाचोरा :
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने पाचोरा आगाराने पाचोरा-लोहारा-कळमसरा एस.टी.बस सुरू केली आहे. याबद्दल लोहारातील पंडित माध्यमिक विद्यालयासह पालकांच्यावतीने चालक, वाहक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच याबद्दल गावातील पालकांसह कळमसरा येथील पालकांनीही पाचोरा आगाराचे आगार प्रमुख यांचे आभार मानले आहे.
पाचोरा आगाराची बस लोहारापर्यंत ये-जा करत होती. परंतु कळमसरा गावातील विद्यार्थ्यांना त्या बसचा काही उपयोग होत नव्हता. म्हणून विद्यालयाच्यावतीने विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यु.डी.शेळके, पर्यवेक्षक पी.एम.सुर्वे यांनी पाचोरा आगाराचे आगार प्रमुख यांना निवेदन देऊन पाचोरा लोहारा असणारी बस सकाळी दहा वाजता पाचोराहून सुटणारी ही पुढे लोहारा यानंतर कळमसरा गावापर्यंत नेण्यात यावी. त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल. त्यानंतर पाचोरा आगाराचे आगार प्रमुख यांनी ही समस्या लक्षात घेतल्यानंतर पाचोरा-लोहारा असणारी बस पुढे कळमसरा गावापर्यंत सुरू केली. ही बस 24 जुलैपासून सुरू केली आहे.
याबद्दल चालक, वाहक यांचा लोहारातील पंडित माध्यमिक विद्यालयाच्यावतीने रुमाल, टोपी, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थिनींनाही मोफत पासेस मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठीही पासेस उपलब्ध करून दिले जाणार आहे. याकामी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक पी.यू.खरे, किरण बारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे.


