साईमत/ न्यूज नेटवर्क/ जामनेर :
येथील रहिवासी तथा महात्मा ज्योतिबा फुले सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष पवन माळी यांच्या आजी धोंडाबाई किसन बावस्कर यांचे गेल्या ५ जुलै रोजी निधन झाले होते. त्यांचा दशक्रिया व गंधमुक्तीचा विधी विधीकर्ते शिवदास महाजन यांच्या हस्ते नुकताच पार पडला. आजीच्या स्मरणार्थ वृक्ष लागवड करण्यात आली. महाजन यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्यात एक हजाराची देणगी दिली. जामनेर शहरात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने विधी केल्याने उपस्थित समाज बांधवांनी कौतुक केले.
विधी करण्याची प्रेरणा महाराष्ट्र राज्याध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव डॉ.सुरेश झाल्टे, विधीकर्ते भगवान रोकडे, प्रचारक रमेश वराडे यांच्याकडून मिळाली.
कार्यक्रमाला सत्यशोधक समाजाचे प्रचारक रमेश वराडे, मुख्याध्यापक कडू बावस्कर, संदीप रोकडे, बाळू महाजन, डॉ.लक्ष्मण माळी, वसंत माळी, विठ्ठल माळी, संजू माळी, रवी झाल्टे, नरेश माळी, विनायक माळी, सुधाकर माळी, राजू माळी उपस्थित होते.