Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»कळमसरेतील शाळकरी विद्यार्थ्यांचा चक्कर येऊन मृत्यू
    अमळनेर

    कळमसरेतील शाळकरी विद्यार्थ्यांचा चक्कर येऊन मृत्यू

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJuly 12, 2024Updated:July 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत/ न्यूज नेटवर्क/ अमळनेर :

    तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववीच्या वर्गातील विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन याचा शेवटच्या तासाला शाळेत चक्कर येऊन पडून दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

    तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन (वय १५) हा शाळेच्या पटांगणात खेळत असताना अचानक चक्कर येऊन पडला. त्यावेळेस शिक्षकांनी त्याला सावरले. त्यानंतर स्थानिक डॉक्टरांनी त्याची तपासणी करत त्याच्यावर प्रथमोपचार केले. त्याला त्वरित अमळनेर येथे डॉ.निखिल बहुगुणे यांच्या दवाखान्यात दाखल केले. त्यांनी तपासून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ.जी.एम.पाटील यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताचे शाळेचे संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्याच्या पश्चात आई-वडील, आजी-आजोबा, काका व दोन बहिणी असा परिवार आहे.

    शिक्षकांचा होता आवडता विद्यार्थी

    घनश्याम हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वडील शेतकरी असल्याने तो शाळेबरोबरच त्यांना शेतातही मदत करीत होता. अत्यंत नम्र आणि हुशार असा घनश्याम हा क्रीडा, नाटक, सांस्कृतिक अशा सर्व कार्यक्रमात भाग घेणारा आणि शाळेच्या शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026

    Amalner:चार जणांकडून साईड न दिल्याच्या वादातून व्यापाऱ्याच्या कारची तोडफोड

    February 20, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.