साईमत I जळगाव I न. प्र. I
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक बिपिन दिनकर झोपे आणि नंदिनीबाई माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका वैशाली बिपिन झोपे यांच्या विवाहबंधनाच्या स्नेहील सहजीवनाच्या वाटचालीला २५ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त ए. टी.झांबरे विद्यालयाच्या मैदानावर मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांच्या सहकार्याने झोपे दांपत्याने आरोग्यदायी २५ वृक्षांचे रोपण केले. तसेच त्या वृक्षांच्या संवर्धनाचा संकल्प केला.
वृक्षारोपण म्हणजे भविष्यासाठी एक नवे पणाची पेरणी आहे. हळुवार बहरणाऱ्या, फुलणाऱ्या या वृक्षांप्रमाणे या झोपे पती, पत्नीच्या आयुष्यात स्नेह, प्रेम फुलत रहावे. समाजाप्रती नवजाणीव जपणाऱ्या या उभयंताना शुभकामना देण्यात आल्या. या वेळी नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सी.एस पाटील, शालेय समन्वयक राहुल वराडे, एन. ओ.चौधरी, कृष्णा जंगले, रंजना सावदेकर, एन.बी.पालवे आदी उपस्थित होते.