पहुरला राष्ट्रीय महामार्गावर खड्डा ठरतोय ‘जीवघेणा’

0
21

साईमत, पहुर, ता. जामनेर : प्रतिनिधी

जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर वाघुर पुलानजीक जीवघेणा खड्डा पडला आहे. त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जळगाव -छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांतर्गत नवीन पुलाचे काम सुरू आहे. सध्या एकाच पुलावरून लहान – मोठी हजारो वाहने ये-जा करतात. त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ असते. बसस्थानक ते पुला दरम्यानच्या भागाचे काँक्रिटीकरण करणे बाकी असल्याने कच्च्या मार्गावर वारंवार खड्डे पडतात. याच १०० मीटरच्या परिघात बालकवयित्री ज्ञानेश्‍वरी भामेरे सह ३ निरपराध नागरिकांचे नाहक बळी गेलेले आहे. अद्यापही पुलानजीकचा भाग कठड्यांअभावी ‘मौत का कुआ’ बनलेला आहे.

नॅशनल हायवे ॲथॉरिटीचे दुर्लक्ष

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन पुलाचे काम गतीने सुरू केले तरी पहुर पेठ गावाकडून पुलानजीकच्या भागास सुरक्षा कठडे लावण्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. याकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांसह नॅशनल हायवे ऑथेरिटीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांसह वाहन चालकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here