साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर
पहुर – कसबे येथील लेलेनगर भागातील रहिवासी प्रकाश शंकर बारी ( फुसे, वय ६०) यांनी राहत्या घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या करुन आयुष्य संपविल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे
पत्नी बाजारात तर मुलगा कपाशीची गाडी भरायला गेलेला असताना घरात कोणीही नसल्याचे पाहून प्रकाश बारी यांनी घराचा दरवाजा अडकवून दोरीने गळपास घेतला.
मुलगा राहुल कपाशीची गाडी भरून घरी आल्यावर दरवाजा उघडताच त्याने वडिलांचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत पाहताच एकच हंबरडा फोडला. शेजारील रहीवाश्यांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.