साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी, ४ जून रोजी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी, २ जून रोजी सायंकाळी फैजपूर पोलीस ठाण्यातर्फे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. निवडुन येण्याचा जल्लोष साजरा करतांना कोणाला त्रास होणार नाही, त्याची काळजी घेण्याचे आव्हान पोलिसांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद शहरात उमटणार नाही. त्यामुळे कुठलेही गालबोट लागणार नाही. सोशल मीडियावर पोस्ट टाकतांना कोणाच्या भावना दुखावणार नाही, अशी पोस्ट टाकू नये, त्याची काळजी घ्यावी. यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी केले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे, माजी उपनगराध्यक्ष कलिम खां मण्यार, शेख कुर्बान, उपनगराध्यक्ष केतन किरंगे, माजी नगरसेवक जफर शेख, माजी नगरसेवक अप्पा चौधरी, भाजपाचे शहराध्यक्ष पिंटू तेली, सामाजिक कार्यकर्ते जलील हाजी शेख सत्तार, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख रियाज, शेख इरफान, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वसीम तडवी, नरेंद्र चौधरी, पोलीस पाटील सुरेश खैरनार, तुषार चौधरी, लक्ष्मण लोखंडे, दिनेश बाविस्कर, संजय चौधरी यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गोपनीय विभागाचे पोलीस विजय चौधरी, योगेश दुसाने, पो.कॉ.विकास सोनवणे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.