Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»संशोधनात पेटंट मिळविणाऱ्यामध्ये गोदावरी अभियांत्रिकी अव्वल
    जळगाव

    संशोधनात पेटंट मिळविणाऱ्यामध्ये गोदावरी अभियांत्रिकी अव्वल

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 2, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    विद्यार्थ्यांनी किंवा प्राध्यापकांनी केलेल्या संशोधनाचे जतन करण्यासाठी पेटंट करून घेणे आवश्‍यक असते. पेटंट हे बौद्धिक संपदेचे महत्त्वाचे अंग आहे. त्याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकेतील महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांना विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनासाठी इंडियन पेटंट, डिझाईन पेटंट, कॉपीराइट्स तसेच इतर देशातील पेटंट हे बहाल केले आहे. यामुळेच इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) मध्ये महाविद्यालयाला ‘स्टार’ मानांकन प्राप्त झाले आहे.

    महाविद्यालयाची संशोधनामध्ये निरंतर प्रगती व्हावी, यासाठी प्राध्यापक वर्ग नेहमी प्रयत्नशील असतो. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नामांकित पब्लिकेशनच्यामार्फत विविध पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकांना मिळालेले पेटंट्स यंत्र विभागात डॉ. विजयकुमार पाटील (प्राचार्य) १ डिवाइस फॉर लेझर मशीनिंग ऑन थिक मटेरियल, २ लेझर बिम मशीनिंग फॉर ॲल्युमिनियम ॲलॉय, प्रा.किशोर महाजन ए मॉडिफाइड मायका बँड हिटर, संगणक विभागात प्रा. प्रशांत शिंपी, प्रा. वेलचंद होले, प्रा. निलेश वाणी प्रा. महेश एन. पाटील, प्रा.निलेश चौधरी एम.एल.बेस्ड सेक्युर्ड स्टॉक मार्केट प्रेडीक्शन डिवाइस, प्रा. देवपाल यादव, ॲडव्हान्सड सेन्टेन्स जनरेशन टेक्निक युजिंग डीप लर्निंग अल्गोरिदम्स, विद्युत विभागात प्रा. महेश एच.पाटील, विंड अँड सोलर पॉवर चार्जिंग स्टेशन, इ अँड टीसी विभागात प्रा. शफिकुर रेहमान एस अहमद, वायरलेस मेसेंजर, प्रा.विजय डी.चौधरी, एन.आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग बेस्ड ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स विभागात डॉ. अनिल कुमार विश्‍वकर्मा एआय बेस्ड इनडोअर एअर प्यूरिफिकेशन डिवाइस, रीडीफायनिंग स्पेक्ट्रम मॅनेजमेंट: डायनॅमिक एलोकेशन अँड काग्नेटिव्ह सोल्युशन्स इन वायरलेस नेटवर्क, अचीविंग ऑप्टिमल सर्विस कॉलिटी इन सेल्युलर नेटवर्क स्ट्रॅटेजीस फॉर क्यूओएएस इन्हेंसमेंट, इन्हेंसिंग बीट एरर रेट परफॉर्मन्स इन ओएफडीएम सिस्टीम थ्रू ऑप्टिमाईज ॲडॉप्टीव्ह कोडींग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, टेक्निक्स यंत्र विभाग (तंत्रनिकेतन) प्रा. कैलास मखीजा, ट्राय सायकल, सेल्फ ऑपरेटेड प्रोटेक्शन डिवाइस, प्रा. कैलास मखीजा, प्रा.वेणू फिरके स्मार्ट लॅडर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांचे नामांकित पब्लिकेशनमध्ये लिखाण प्रकाशित झाले आहे. त्यात डॉ. हेमंत नेहेते, डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. प्रवीण पाटील, डिझाईन अँड अनालिसिस ऑफ लिफ स्प्रिंग, डॉ. हेमंत नेहेते, परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन ऑफ चाफ कटर प्रा. हेमराज धांडे, प्रा. महेशकुमार एन.पाटील, प्रा. विजय डी.चौधरी, प्रा. हरीश पाटील, इंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट अँड स्टार्टअप प्रा. विजय डी.चौधरी, प्रा. हेमराज धांडे, प्रा.राजेंद्र व्ही.पाटील, डॉ. हेमंत इंगळे एमबेडेड सिस्टिम्स अँड आयओटी प्रा. विजय डी.चौधरी, डॉ. अनिलकुमार विश्‍वकर्मा, प्रा. महेशकुमार एन.पाटील, प्रा. निलेश चौधरी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यांचा समावेश आहे.

    यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी प्राध्यापकांच्या उपक्रमाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, उपाध्यक्ष सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील व हदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांनी कौतुक केले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून महाविद्यालयांमध्ये संशोधनाला जास्तीत जास्त गती व चालना देण्यासाठी प्राध्यापक वर्गांची सतत संपर्क ठेवून त्यांना प्रोत्साहन देत राहणार असल्याचे सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Parola : अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्ता सुरक्षा जागृती मोहीम

    December 21, 2025

    healthy life : सातत्य, सकारात्मक विचार, सजगता निरोगी जीवनाचे गमक

    December 21, 2025

    Jamner : जामनेर नगरपरिषदेत भाजपची सत्ता कायम

    December 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.