साईमत, बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यातील शेती कामाला वेग आला आहे. तसेच पेरणी जवळ येत आहे. शहरात बियाणे, रासायनिक खते वेळेवर शेतकऱ्यांना मिळाल्यास शेतकऱ्यांची वेळेवर पेरणी होईल. शहरात आतापासूनच शासनाने खबरदारी म्हणून सर्व कृषी विक्रेते यांच्यावर नियंत्रण ठेवावे. प्रत्येक दुकानावर प्रत्येक बियाण्यांचे भावफलक असावे, शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, रासायनिक खते वेळेवर मिळावी. तसेच शेतकऱ्यांना पिक कर्जही तत्काळ मिळावे, अशा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेतर्फे तहसीलदार महेंद्र वाणी यांना देण्यात आले.
शेतकऱ्यांना बियाणे वेळेवर पुरवा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेतर्फे देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष दगडु शेळके, मधुकर पाटील, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण मोरे, तालुका उपाध्यक्ष संतोष पाटील, नाना पाटील, सुवर्णसिंग हजारी, राजु चौधरी उपस्थित होते.
