उचंदेतील भीम स्टार फाउंडेशनतर्फे बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात ४९ जोडप्यांचे ‘शुभमंगल’

0
89

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

तालुक्यातील उचंदे येथील भीमस्टार फाउंडेशन संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे बौद्ध धर्माचा सामूहिक विवाह सोहळा २७ मे रोजी सरस्वती इंग्लिश स्कुलच्या प्रांगणात पुरनाड शिवारात घेऊन त्यात ४९ जोडप्यांचे ‘शुभमंगल’ झाले. अध्यक्षस्थानी आ.चंद्रकांत पाटील होते. प्रमुख उद्घाटक डॉ. जगदीश पाटील, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष ॲड.रोहिणी खडसे, सेवानिवृत्त बँक मॅनेजर एन.जी.शेजोळे, डॉ. प्रवीण पाचपांडे, युवराज पाटील होते. सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून वंदन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक विवाह सोहळ्यास सुरुवात झाली. पूज्य भंत्ते सारीपुत्य यांनी त्रिशरण, पंचशील, परित्राण पाठ, जय मंगल अष्टगाथा घेण्यात आले. प्रतिज्ञा देऊन विवाहांचे सोपस्कार पार पाडले.

भीमस्टार फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक इंगळे, समिती अध्यक्ष गजानन सुरवाडे, उपाध्यक्ष महेंद्र हेरोळे, स्वागत अध्यक्ष साधना शेजोळे दरवर्षी मुक्ताईनगर तालुक्यात बौद्ध धर्म सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत असतात. विवाह सोहळ्याला चांगला प्रतिसाद मिळून अनेक जोडपे विवाहबद्ध होतात.

महागाईच्या काळात गोरगरीब लोकांना आपल्या उपवर झालेल्या मुला-मुलींचे लग्नाचा अवाढव्य अनाठाई खर्च करणे परवडत नाही. त्यामुळे वेळ आणि पैसाही वाचतो. आई-वडिलांची चिंताही मिटते, असे प्रत्येक समाजात सामूहिक विवाह सोहळे कार्यक्रम घेतले गेले पाहिजे, असे मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन भीमस्टार फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष व त्यांची संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक केले.

दरवर्षी सामूहिक विवाह सोहळा घडवून आणतात. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. जगदीश पाटील, डॉ.प्रवीण पाचपांडे, बी.डी.गवई, युवराज पाटील, समाज कल्याण विभागाच्या शीला अडकमोल, साधना शेजोळे, मोहन मेढे, किशोर चौधरी, प्रमोद सोनवणे, नंदू हिरोळे, विशाल रोटे, प्रा. संजीव साळवे, प्रमोद इंगळे पो. पा. अनिल वाघ, राजू सवर्ण, महेश तायडे, उमेश गाढे, देवानंद पाटील, विश्‍वनाथ वाघ, सुनील इंगळे, राहुल शेजोळे, निलेश शेजोळे, रतन तायडे, प्रवीण वाघ, जीवन इंगळे, सागर अटकाळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तथा आभार प्रशांत राज तायडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here