Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»श्री पांडुरंगराय पादुका पालखी सोहळ्याचे शुक्रवारी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान
    मुक्ताईनगर

    श्री पांडुरंगराय पादुका पालखी सोहळ्याचे शुक्रवारी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 28, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

    श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि श्री संत मुक्ताबाई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या श्री पांडुरंगराय पादुका पालखी सोहळ्याचे शुक्रवारी, ३१ मे रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान होत असल्याची माहिती श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी दिली.

    श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र मुक्ताईनगर हा परंपरेने सुरु असलेला पालखी सोहळा श्री संत मुक्ताबाई यांच्या ७२७ व्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी ३१ मे रोजी सकाळी ६ वाजता श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान ठेवीत आहे. श्री पांडुरंगराय पादुकांची सकाळी ६ वाजता विधीवत पुजा झाल्यानंतर मंदिर समितीच्यावतीने मानकऱ्यांचा सन्मान होईल. हा सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान ठेवेल. ३१ रोजी सकाळी ९ वाजता करमाळा, दुपारी १ वाजता अहमदनगर, सायंकाळी ४ वाजता नेवासा फाटामार्गे सायंकाळी ७ वाजता गारखेडा छत्रपती संभाजीनगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात मुक्कामी पोहोचेल .

    शनिवारी, १ जून रोजी सकाळी सिल्लोड, दुपारी जामनेर येथे संत नामदेव महाराज पादुका भेट सोहळा, नैवेद्य व भोजन घेवून सायंकाळी कुऱ्हा पानाचे मार्गे सायंकाळी ५ वाजता श्री विठ्ठल मंदिर, भुसावळ येथे पोहोचेल. येथे संत निवृत्तीनाथ व श्री पांडुरंगराय पादुका भेटीचा सोहळा होईल तर पंढरपूरहुन निघालेल्या संत नामदेव महाराजांच्या पादुका मुक्ताईनगर मुक्कामी पोहोचतील. रविवारी, २ रोजी श्री क्षेत्र कोथळी येथे श्री संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा आहे. सोहळ्यासाठी श्री पांडुरंगराय पादुका पालखी सोहळा पोहोचेल. संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळ्यानिमित्त कीर्तनाची सेवा संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. केशवदास नामदास यांची होईल तर रात्री संत निवृत्तीनाथ संस्थानचे विश्‍वस्त ह.भ.प. जयंत महाराज गोसावी यांची कीर्तनाची सेवा होईल. सोमवारी, ३ जून रोजी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र कोथळी ते श्री क्षेत्र मुक्ताईनगर दिंडी मिरवणूक होईल. त्यानंतर हा सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथे मुक्कामी विसावेल.

    मंगळवारी, ४ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ द्वादश पारणे सोहळा होईल आणि त्यानंतर श्री पांडुरंगराय पादुका पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरु होईल. मलकापूर, मोताळा, बुलढाणा मार्गे हा सोहळा श्री क्षेत्र चिखली येथील श्री रेणुका माता मंदिरात मुक्कामी पोहोचेल. बुधवारी, ५ जून रोजी देऊळगावराजा, जालना, अंबड, गेवराई मार्गे बीड मुक्कामी पोहोचेल. बीड येथील श्री हनुमान मंदिरात पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे. गुरुवारी, ६ जून रोजी कुंतलगीरी फाटा, वाशी, बार्शी येथील श्री भगवंत मंदिर, कुर्डुवाडी मार्गे सायंकाळी ६ वाजता हा सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल. पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे, जुने मंदिराचे व्यवस्थापक ह.भ.प. उद्धव महाराज जुनारे, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे उपस्थित असतील.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर शेतकऱ्यांचा महामार्गावर उग्र रस्ता रोको आंदोलन

    February 3, 2026

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.